BJP is not protector of Hindu deities Mahua Moitra kolkata sakal
देश

भाजप हिंदू देवतांचा रक्षक नाही - महुआ मोईत्रा

खासदार महुआ मोईत्रा: बंगालींना देवीपूजा शिकवू नये

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपला पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. भाजप हिंदू देवतांचा रक्षक नसून पक्षाने बंगाली लोकांना देवीची पूजा कशी करायची, हे शिकवू नये, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. त्या एका वृत्तवाहिनीवर बोलत होत्या. कालीमाता ही माझ्यासाठी मांसभक्षण करणारी व मद्यसेवन करणारी देवी आहे, असे मत त्यांनी ‘काली’ या माहितीपटाच्या वादग्रस्त पोस्टरबाबत बोलताना व्यक्त केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता.

मोईत्रा म्हणाल्या, की मी या विषयावर एका परिपक्व राजकारण्याप्रमाणे व्यक्त झाले आहे. उत्तर भारतात देवतांची पूजा कशी होते, त्यावरून भाजपने बंगालबाबत मते व्यक्त करू नयेत. देशाच्या इतर भागांत देवतांच्या पूजाअर्चेची पद्धत वेगळी आहे. भाजप स्वत:चा हिंदुत्वाचा अजेंडा इतर वांशिक गटांवर लादत आहे. देशाच्या फायद्यासाठी त्याचा प्रतिकार करायला हवा. कालीमातेची भक्त असल्याने मला तिची पूजा कशी करायची हे माहीत आहे. ज्या भाजपशासित राज्यांत आपल्याविरुद्ध ‘एफआयआर’नोंदले गेले आहेत, अशा राज्यांनी कालीमातेला दिल्या जाणाऱ्या प्रसादाबद्दल न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''तू माझ्या मुलाचं करिअर बर्बाद केलंय''; 6 SIX नंतर स्टुअर्ट ब्रॉडचे वडील युवराजला काय म्हणाले होते?

Aundh Leopard : औंध परिसरात पहाटे बिबट्या; नागरिकांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन!

Smriti Mandhana Father: स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्त्वाचे अपडेट्स

Rahuri Crime:'अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार'; आरोपीला अटक

Junnar Iron Man : ओझरचे अशोक जगदाळे ठरले इंटरनॅशनल आयर्न मॅन; आठ तासांत विक्रमी कामगिरी!

SCROLL FOR NEXT