देश

दिल्लीत चक्क भाजप आणि काँग्रेसची हातमिळवणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने दिल्लीत महानगर पालिका निवडणुकीत चक्क हातमिळवणी केली आहे. दिल्ली महानगर पालिकेच्या उत्तर विभागात आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे. तर संख्याबळ असूनही 'आप'च्या पदरी निराशा आली आहे.

काँग्रेसच्या सीमा ताहिरा अध्यक्ष तर सुलक्षणा उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 09 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसकडे केवळ 06 नगरसेवकांची मते होती. काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाजपची तीन मते काँग्रेसला मिळाली आहे. या विभागात आपचे आठ नगरसेवक होते. तरीही 'आप'ला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देखील मिळवता आले नाही.

भाजपची नजर महानगर पालिकेपेक्षा विधानसभा मतदारसंघांवर आहे. यामध्ये चांदणी चौक, मटिया महल, सदर बाजार आणि बल्लीमारान या मतदार संघांचा समावेश आहे. या मुस्लीमबहुल मतदार संघात भाजप काँग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपला ठावूक आहे की, मुस्लीमबहुल भागात काँग्रेस मजबूत झाल्यास, आपची मते विभागली जातील. त्याचा सर्वाधिक लाभ भाजपलाच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT