Anurag Thakur vs Rahul Gandhi esakal
देश

Pegasus Case : केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी ठोकलं मोदींविरोधात भाषण; भाजपनंही दिलं सडेतोड उत्तर

राहुल गांधींच्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी पलटवार केलाय.

सकाळ डिजिटल टीम

'परदेशात जावून पंतप्रधान आणि देशाची बदनामी करणं ही राहुल गांधींची सवय बनलीये.'

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University London) केलेल्या भाषणात पेगासस प्रकरणाबाबत (Pegasus Case) मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

राहुल गांधींच्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी पलटवार केलाय. ते म्हणाले, राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशी भूमीत जावून भारताची बदनामी करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा सन्मान वाढला आहे, असं मोठे नेते बोलतात. राहुल गांधींनी निदान इटलीच्या पंतप्रधानांचं तर ऐकायला हवं होतं, असा टोला त्यांनी लगावला.

ठाकूर म्हणाले, 'परदेशात जावून पंतप्रधान आणि देशाची बदनामी करणं ही राहुल गांधींची सवय बनलीये. कधी ते स्वतः करतात, तर कधी ते त्यांच्या परदेशी मित्रांना करायला लावतात. महिला, मजूर, गरीब यांच्या हिताचा विचार करणारा मजबूत पंतप्रधान आपल्याला मिळाला आहे. मात्र, त्यांची बदनामी ते वारंवार करत आहेत.'

भारत ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. विक्रमी एफडीआय भारतात येत आहे. राहुल गांधी मीडियाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही तर देशाच्या संवैधानिक संस्था आणि न्यायपालिकेची बदनामी करण्याची आणि नंतर कोर्टाची माफी मागण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, असा हल्लाबोलही ठाकूर यांनी राहुल गांधींवर केला.

माझ्या फोनमध्ये 'पेगासस' होता - राहुल गांधी

केंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये (केंब्रिज जेबीएस) राहुल गांधी म्हणाले, 'माझ्या स्वतःच्या फोनमध्ये पेगासस होता. अनेक बड्या नेत्यांच्या फोनमध्येही पेगासस होता. अनेक गुप्तचर अधिकार्‍यांनी मला फोन करून सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन सतत टॅप केले जात आहेत. पेगाससच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारला धारेवर धरलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT