Arun Jaitley 
देश

जेटलींवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : विख्यात कायदेतज्ञ आणि माजी अर्थ तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यावर उद्या ता. २५ दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली.

67 वर्षीय जेटली यांनी दुपारी बाराच्या सुमारास एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर जेटलींच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये तयार झालेले  अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांनी एम्स कडे धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि दौरा अर्धवट सोडून ते उद्या सकाळपर्यंत राजधानीत परत येण्याची शक्यता आहे.

“हे  जगातून निघून जाण्याचे वय नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि वकीलाला घडवणाऱ्या या मोठ्या नेत्याचे जाणे हे अतिशय क्लेशकारक आहे,” असे सांगताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा कंठ दाटून आला.

दरम्यान जेटली यांचे पार्थिव त्यांच्या ए 44 कैलास कॉलनी अस्थानी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल सकाळी दहा ते दुपारी 1 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्या नंतर निगम बोध घाटावर राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT