BJP News 
देश

BJP News: पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू, राजकारण तापले! काय आहे प्रकरण?

बिहार राज्यात ही घटना घडली

Sandip Kapde

Bihar News: बिहार विधानसभेत राडा झाल्यानंतर भाजप नेत्यांनी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेत एका भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. पाटणा येथील डाकबंगला चौकात पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

लाठीचार्जमध्ये जहानाबादचे भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये विजय जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याप्रकरणी नितीश सरकारला घेरले आहे.

नड्डा म्हणाले, पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि क्रोधाचा परिणाम आहे. भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी महाआघाडीचे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे, ज्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे. त्याला वाचवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्यांनाही नैतिकतेचा विसर पडला आहे.

शिक्षक नियुक्तीच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात मोर्चा

आज (गुरुवार) बिहार विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. शिक्षकांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजप सदस्यांनी वेलमध्ये येऊन सरकारला घेराव घातला आणि निदर्शने केली.

त्यानंतर भाजपच्या दोन आमदारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रॅली काढणाऱ्या आमदार आणि नेत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT