देश

Video : काँग्रेसमध्ये लोकशाही आहे का? राहुल गांधींच्या घणाघाताला भाजपचं प्रत्युत्तर

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसतर्फे देशभरात निषेध केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसतर्फे देशभरात निषेध केला जात असून, आज सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. ज्यात त्यांनी लोकशाही नष्ट झाल्याचे म्हणत जो आवाज उठवतो त्याच्या मागे ईडी लावली जाते असा घणाघात राहुल यांनी केला होता. या आरोपांनंतर भाजपकडून रविशंकर प्रसाद यांनी पुढाकार घेत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आणीबाणीचा संदर्भ दिला आहे.

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींच्या आजीने मीडियावर बंदी घातली होती. हे लोक आपल्याला लोकशाहीचा सल्ला देतात. राहुल गांधीजी कृपया एका प्रश्नाचे उत्तर द्या तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? काँग्रेसमध्ये चांगले नेते आहेत, पण सोनियाजी, राहुलजी आणि प्रियंकाजी यांचा स्वतःचा पक्ष आहे. लोकांनी तुम्हाला नाकारले आहे, मग त्याला आम्ही जबाबदार कुठून? असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी म्हणतात की, ते नेहमी खरे बोलतात. तर मग ते पण तो जामिनावर का चालले आहे असा प्रश्न आम्हाला विचारायचे आहे. नॅशनल हेराल्डचे प्रकरण काय आहे हे आज देशाला सांगण्याची गरज आहे. हे संपूर्ण प्रकरण भाजप सरकार येण्यापूर्वीचे असल्याचे रविशंकर प्रसाद म्हणाले. राहुल गांधी आता देशावर टीका करत आहेत. आपला राजकीय स्वार्थ आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी ते देशातील संस्थांची बदनामी करत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी रविशंकर प्रसाद यांनी कलम 370 चाही उल्लेख केला. आज कलम 370 रद्द करण्यात आले आहे. आज काश्मीरमध्ये तिरंगा फडकत असून जल्लोष व्यक्त केला जात असताना काँग्रेसवाले हिटलरबद्दल बोलत आहे. पण या संपूर्ण देशाने आणीबाणीच्या वेळी हुकूमशाही पाहिली असल्याची आठवण रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: आधी डोक्यात टीव्ही फोडला, नंतर हंड्याने बेदम मारहाण, पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; ठाण्यात काय घडलं?

Latest Marathi News Live Update : ३ महिन्यांच्या मुलीला गटारात फेकून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली आरोपी वडिलांना अटक

Obesity Care: लठ्ठपणाविरोधातील लढ्याला चालना; वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे अत्याधुनिक ऑबेसिटी क्लिनिकची सुरुवात

"दुनियादारीनंतर मी हवेत होतो" संजय जाधव यांचा धक्कादायक खुलासा "सेटवर मी टाईमपास केला"

Bakri Eid Goat Market: तळेगाव ढमढेरे बाजारात बोकडाला ८० हजार रुपये बाजार भाव, विक्रमी आवक

SCROLL FOR NEXT