BJP Leader Subramanian Swamy slam PM Modi 
देश

PM Modi In Ayodhya : ना बायकोसोबत रामाप्रमाणे वागले ना रामराज्य चालवलं; भाजपच्या बड्या नेत्याचा मोदींना घरचा आहेर

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याकडे देश तसेच विदेशातील राम भक्तांचे लक्ष लागले आहे.

रोहित कणसे

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याकडे देश तसेच विदेशातील राम भक्तांचे लक्ष लागले आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित पार पडणार आहेत. यादरम्यान भाजपच्या एका बड्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत घरचा आहेर दिला आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्या प्रभू श्रीरामांच्या तत्वांचे पालन केले नसून त्यांनी गेल्या १० वर्षात रामराज्याप्रमाणे वागणूक देखील केली नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले आहेत.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी लिहीलं की, नरेंद्र मोदी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होत असले तरी पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचे पालन केलेलं नाही, विशेषतः त्यांच्या पत्नीविषयीची वागणूक पाहाता असं दिसून येत नाही, तसेच पंतप्रधान असताना गेल्या १० वर्षात ते रामराज्याप्रमाणे वागलेले नाहीत असेही भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाचे आगमन

Amethi Gulgula : केकच्या युगातही कायम आहे अमेठीच्या 'गुलगुला'ची क्रेझ! पाहा साध्या गव्हाच्या पिठापासून कशी बनते ही पारंपरिक मिठाई

Ausa Crime : शौचास बसण्याच्या कारणावरून परप्रांतीय मजुरास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; मारहाणीत मजूर ठार, शेतकरी अटकेत

SCROLL FOR NEXT