bbc documentary on gujarat riots  sakal
देश

PM Modi Certificate: अखेर भाजपच्या नेत्यानंच PM मोदींचं पदवी प्रमाणपत्र आणलं समोर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्रावरुन सध्या देशात वाद सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्रावरुन सध्या देशात वाद सुरु आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात हायकोर्टानं दंडही ठोठावला आहे. यापार्श्वभूमीवर आता भाजपच्याच एका नेत्यानं PM मोदींचं पदवी प्रमाणपत्र समोर आणलं आहे. तसेच यावरुन वाद का निर्माण केला जातोय? असा सवालही विचारला आहे. (BJP leader Subramanyam Swamy brought in front degree cert of PM Modi)

भाजपचे माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींचं प्रमाणपत्र ट्विट केलं आहे. तसेच यामध्ये त्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. त्यांनी म्हटलं की, "मोदींच्या शिक्षणावरुन इतका अनावश्यक गोंधळ का निर्माण केला जातोय. सहा वर्षांपूर्वी अमित शहा आणि अरुण जेटली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मोदींचं हेच प्रमाणपत्र दाखवलं होतं. मोदींचं एमएचं प्रमाणपत्र पाहा, मी सांगतो ते खरंय ना?" असंही स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पदवीच्या प्रमाणपत्राची माहिती मागितली होती. ही माहिती अर्जदाराला देण्यात यावी, असे आदेश माहिती आयुक्तांनी दिल्ली विद्यापीठाला दिले होते. त्यानंतर विद्यापीठानं माहिती अधिकारात ही माहिती न देण्याची भूमिका घेत थेट गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर गुजरात हायकोर्टानं पंतप्रधानांच्या शैक्षणिक कादगपत्रांची माहिती माहिती अधिकारातून देता येणार नाही असा निकाल देत ही माहिती मागितल्याबद्दल केजरीवाल यांना २५,००० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT