Untitled-1.jpg 
देश

...आम्ही दिल्लीचा सिरिया होऊ देणार नाही : तरुण चुघ

वृत्तसंस्था

दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. येत्या 8 फेब्रुवारीला विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरु आहे. प्रचारात सध्या रंगत आली आहे. यावेळी सर्वच पक्षांचे नेते विवादीत भाषणे करताना दिसत आहेत. यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे भाजप नेते तरुण चुघ यांच्या वक्तव्यांची.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी स्फोटक भाषण केले होते. त्याचेच पडसाद दिल्लीत सध्या उमटताना दिसत आहेत. वादपुर्ण भाषण व ट्विट करण्याच्या यादीत आता नव्याने अजून एका नावाची भर पडली आहे. ते म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सचिव तरुण चुघ हे होय.

चुघ यांनी आपल्या वादपुर्ण ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही कदापीही दिल्लीचा सिरिया होऊ देणार नाही. आम्ही आमच्या राजधानीत इसिसचे टेरिरिस्ट माॅडेल चालू देणार नाहीत. त्याची परवानगी आम्ही कदापीही देणार नाहीत. दिल्लीला आम्ही धग पोहचू देणार नाही. 

तरुण चुघ यांनी ट्विट करत म्हटले आहे, शाहीनबाग येथे आंदोलन करणारे आंदोलक हे मुख्य रस्त्यावर उतरून जाणीवपुर्वक नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण करत आहेत. यामध्ये हे देशविरोधी लोकं आपल्या मुला-बाळांचा वापर करत आहेत. आम्ही दिल्लीला अशा लोकांपासून नक्कीच वाचवू. शाहीनबाग येथे एक महिण्यापासून सुरू असणाऱ्या आंदोलनावर चुघ यांनी कडाडून टीका केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

SCROLL FOR NEXT