congress, bjp 
देश

'भाजपकडून 25 ते 35 कोटी देऊन काँग्रेस आमदार खरेदीचा प्रयत्न'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 25 ते 35 कोटी रुपये देऊन काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. 

मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. अवघ्या काही जागांसाठी विरोधी पक्षात बसावे लागलेल्या भाजपने काँग्रेस आमदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचाही आरोप केला जात आहे.

दिग्विजयसिंह म्हणाले, की काँग्रेस आमदारांना विकत घेण्यासाठी मध्य प्रदेश भाजपाकडून घोडेबाजार केला जात आहे. मध्य प्रदेशातील आमदार कर्नाटकमधील आमदारांसारखे नाहीत. हे बिकाऊ आमदार नाहीत. मी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप लावत नाही. शिवराज चौहान आणि नरोत्तम मिश्रा यांच्यात एकमत झालेले आहे. एकाने मुख्यमंत्री आणि दुसऱ्याने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. शिवराज चौहान यांच्याकडून काँग्रेस आमदारांना फोन लावण्यात येत आहेत. एका आमदाराला 25 ते 35 कोटी रुपये ऑफर दिली जात आहे. 5 कोटी आता घ्या, दुसऱ्या टप्पा राज्यसभा निवडणूक आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण रक्कम सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी देऊ असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

SCROLL FOR NEXT