bjp Lok Sabha member uday pratap singh demands law to enforce two child norm  
देश

देशात 'दोन अपत्ये' धोरणासाठी कायदा करा; भाजप नेत्याची लोकसभेत मागणी

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार उदय प्रताप सिंह (Uday Pratap Singh) यांनी देशात 'दोन अपत्ये' धोरण (Two Child Norm) लागू करण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असे भाजप खासदार शुक्रवारी लोकसभेत (Lok Sabha) म्हणाले.

उदय प्रताप सिंह यांनी झिरो अवर(Zero Hour) मध्ये सांगितले की, देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे घरे, रस्ते आणि इतर सर्व संसाधनांवर दबाव वाढत आहे. या देशाची भौगोलिक स्थिती 135 कोटी लोकांना सांभाळण्यासाठी योग्य नाही, त्यामुळे येत्या काही वर्षांत काय होईल सांगता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.

मध्य प्रदेशातील होशंगाबादचे भाजप खासदार लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा, जेणेकरून देशात दोन अपत्ये धोरण (Two Child Policy) लागू केले जाईल, अशी मागणी केली. देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणे इत्यादी विशिष्ट गोष्टींसाठी हा नियम आधीच लागू आहे. राजस्थानमध्ये जर एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त मुले असतील तर त्याला स्थानिक निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाते. त्याचप्रमाणे, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना स्थानिक निवडणुका लढवण्यापासून रोखण्याची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT