Narendra Modi  esakal
देश

BJP Loksabha Election : भाजपकडून निवडणुकीची तयारी; प्रचाराचा बुलंदशहरमधून बिगुल फुंकणार

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी आज दिली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी आज दिली. अयोध्येतील मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरची प्रचाराच्या प्रारंभासाठी निवड करण्यात आली आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशात लोकसभेच्या १४ जागा असून त्यापैकी ८ जागा गतवेळी भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी दहापेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने पश्‍चिम उत्तर प्रदेशात प्राबल्य असलेल्या राष्ट्रीय लोकदलाशी आघाडी केली आहे. जागा वाटपाच्या अनुषंगाने सपची काँग्रेससोबतही बोलणी सुरू आहेत.

बुलंदशहरच्या सभेला पाच लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. राज्यातील सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा पंतप्रधानांकडून या सभेत केली जाण्याची शक्यता आहे. मेजर ध्यानचंद विश्वविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि अलिगड- कन्नौज महामार्गाचे लोकार्पण यावेळी केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT