BJP 
देश

राज्यसभेत भाजप बहुमताच्या जवळ

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्यसभेतील बहुमताचे दुष्काळ निवारण करण्याचा चंग भाजप नेतृत्वाने बांधला आहे.

हिवाळी अधिवेशन येत्या १८ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होईल तेव्हा महिनाभराच्या या अधिवेशनातच भाजपने बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार के. सी. राममूर्ती यांच्यापाठोपाठ आणखी दोन ते तीन कन्नड खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून, यातील दोघे काँग्रेसचे दिग्गज नेते असल्याचे सांगितले जाते. एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे डी. कृपेंद्र रेड्डी यांच्यावरही भाजपने जाळे फेकले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बुद्धिवादी वर्तुळात उठबस असलेल्या एका खासदारांशीही भाजपने संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे. सप, काँग्रेस व तेलुगू देसमचे अनेक खासदार यापूर्वीच भाजपकडे गेले आहेत. राममूर्तींच्या राजीनाम्यानंतर व भाजपच्या वेटिंग लिस्टवरील आणखी सदस्यांना धरून भाजप आघाडीला आता फक्त चार ते पाच खासदार हवे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी १२६ हा जादुई आकडा आहे.

अण्णा द्रमुकचे ११, तेलुगू देसमचे सहा आणि वायएसआर काँग्रेसचे दोन खासदारही भाजपकडे आहेत. प्रसंगी नवीन पटनाईकांचा बीजू जनता दलही मोदींना पाठिंबा देतो, हे कलम ३७० रद्द करण्यासारख्या विधेयकावेळी नुकतेच दिसले आहे.

२४५ राज्यसभेचे सदस्य
८३ भाजपचे संख्याबळ
११९ ‘एनडीए’ धरून संख्याबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT