UP CM Yogi Adityanath PM Narendra Modi Esakal
देश

Yogi Adityanath: योगी अदित्यनाथांचे मुख्यमंत्रीपद जाणार? दिल्लीत काय काय घडले? मंत्री आमदारच म्हणत आहेत...

Uttar Pradesh CM: लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे खासदार निम्म्याने कमी झाले आहेत.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे खासदार निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे या निकालानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व उत्तर प्रदेशात नेतृत्त्व बदल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अशात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्यही गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री योगी अदित्यनाथांवर नाराज असून ते बंडखोरी करणार असल्याची चर्चा सतत सुरू आहे.

अशात त्यांनी काल केलेली एक्सवरील पोस्ट आणि दिल्ली दौरा यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातील बैठकीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे पद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मोदी-शहांची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ७ लोककल्याण मार्गावरील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

या बैठकीबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेतील बदलांच्या रूपरेषेसोबतच अनेक राज्यांतील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीवर बुधवारी भाजपमध्ये लखनौ ते दिल्लीपर्यंत बैठकांचा धडाका सुरूच होता.

मंगळवारी रात्री उशिरा पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणारे उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी बुधवारी दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

लोकसभेच्या निकालाचे पडसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान भूपेंद्र चौधरी यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीशी संबंधित माहिती दिली.

त्यानंतर अवघ्या काही तासांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले.

पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर शाह त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी भूपेंद्र चौधरी यांना भेटण्यासाठी बोलावले.

चौधरी यांनी शाह यांना उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीशी संबंधित वस्तुस्थितीची माहिती दिली.

दिल्लीत सुरू असलेल्या या सर्व राजकीय घडामोडीदरम्यान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन लखनौला परतले आहेत.

योगींच्या कार्यपद्धतीवर मंत्री-आमदारांकडून टीका

राज्य सरकारमधील मंत्री आणि निषाद पक्षाचे प्रमुख संजय निषाद यांनी सरकारला धारेवर धरले आहे. 15 जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, तुम्ही बुलडोझरचा वापर करून लोकांची घरे पाडाल तर ते तुम्हाला मतदान करतील का?

...तर पुन्हा सरकार येणार नाही

13 जुलै रोजी जौनपूरमधील बदलापूरचे भाजप आमदार रमेश चंद्र मिश्रा यांनी राज्यात पक्षाची स्थिती चांगली नसल्याने केंद्रीय नेतृत्वाला राज्यात मोठे निर्णय घेण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते की, "भाजपची स्थिती आज चांगली नाही. पण ही परिस्थिती सुधरू शकते. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाला मोठे निर्णय घ्यावे लागतील. केंद्रीय नेतृत्वाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच आम्हाला 2027 मध्ये पुन्हा सरकार बनवता येईल, अन्यथा पुन्हा आमची सत्ता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक; कोण आहे बजरंग सिंग?

RBI EMI Rule: RBI नवीन नियम आणणार; EMI न भरल्यास फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होणार लॉक

Ankita Valavalkar: अंकिता वालावलकरने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिली गुड न्यूज! म्हणाली...'मी आणि कुणाल आता...'

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

SCROLL FOR NEXT