Monsoon Session Esakal
देश

Monsoon Session: राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्याचे राज्यात उमटले पडसाद; विधानभवनात सत्ताधारी-विरोधक आमने सामने, फलक घेत केलं आंदोलन

Maharashtra Monsoon Session: खासदार राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातील पावसाळा अधिवेशनात उमटल्याचे चित्र दिसून येत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून विधानभवनात सत्ताधारी-विरोधक आमने सामने आल्याचे दिसून येत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजकीय दृष्ट्या कालचा दिवस चांगलाच गाजला. एकीकडे लोकसभेच्या अधिवेशनात खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अंबदास दानवे-प्रसाद लाड यांच्यातील तू-तू-मै-मैमुळे राज्यात देखील चर्चेला उधाण आले आहे. या घटना काल घडल्या मात्र, आज दुसऱ्या दिवशीही विधानभवनात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

या विरोधात भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवानाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी सुरू केली आहे. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे फलक झळकवत राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

काल(सोमवारी) संसदीय अधिवेशनात खासदार राहुल गांधी भाजपवर जोरदार टीका केली. अधिवेशनात बोलताना राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा संदर्भ देत भाजपवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधीमंडळातही पडसाद उमटले. महाराष्ट्र विधीमंडळात भाजप आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिंदूंचा अपमान सहन करणार नाही, अशा आशयाचे बॅनर भाजप आमदारांनी हातात घेत पायऱ्यांवर आंदोलन केलं. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदमध्ये विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रसाद लाड म्हणाले, 'दानवे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे. त्यांनी माझी नाही, तर माझ्या आईची माफी मागितली पाहिजे. प्रत्येक गुन्हेगारांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. माझं मत आहे की, सरकारच्या निर्णयाशी सहमत राहील. पण राजीनामा मागितला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांना शिक्षा केली पाहिजे', असंही पुढे लाड यांनी म्हटलं आहे.

'आमदार अंबादास दानवे यांनी मला शिवीगाळ केली. दानवेंनी सभागृहात गैरवर्तन केलं. २५ वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झालेल्या माझ्या आईविषयी अपशब्द काढले. एका विरोधीपक्ष नेत्याला हे योग्य वाटतं का? बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीला महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा. त्यांचा पूत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा नेता आज अशा शब्दात शिवीगाळ करतो. त्यांनी त्यांना जाब विचारायला हवा. दानवेंनी माझ्या आई-बहिणीचा अपमान केला आहे, असे लाड यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

SCROLL FOR NEXT