Vinod Tawde esakal
देश

Bjp Mission 2024 : लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे फेरबदल, पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना मिळाली ही जबाबदारी

पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

Bjp Mission 2024 : 2024च्या लोकसभा (Loksabha) निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाले असून पक्षाने नवीन टीमची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. नवीन यादीमध्ये 13 उपाध्यक्ष आणि 9 सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे. भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये फेरबदल केले. तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष बंदी संजय कुमार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT