देश

'मेनका गांधी भाजप खासदार असल्याची लाज वाटतेय'

नामदेव कुंभार

एका कुत्र्याच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत भाजप खासदार मेनका गांधी यांनी एका पशुवैद्यकीय डॅाक्टराला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपवरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमधील भाजप आमदारानेही मेनका गांधी यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडलं आहे. मेनका गांधी भाजप खासदार असल्याची लाज वाटतेय, असं ट्विट भाजप आमदार अजय विष्णोई यांनी केलं आहे.

मध्य प्रदेशचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री अजय विष्णोई यांनी शनिवारी ट्विट करत मेनका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ट्विटमध्ये अजय विष्णोई म्हणाले की, 'खासदार श्रीमती मनेका गांधी यांनी पशुवैद्य डॉ. विकास शर्मा यांच्याशी केलेल्या वक्तव्यामुळे जबलपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाची किंमत कमी होत नाही, किंवा त्याची पातळी घसरत नाही. परंतु यामुळे मेनका गांधी अत्यंत निंदनयी (घटिया) महिला असल्याचे सिद्ध होते. त्या माझ्या पक्षाचा खासदार (नेता नाही) आहेत, याची मला लाज वाटतेय.'

मेनका गांधी यांच्यावर पशुवैद्यकीय डाँक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेनका गांधांचा निषेध, बायकॉट मेनका गांधी असा ट्रेड टि्वटवर सुरु झाला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. मेनका गांधी यांनी या प्रकरणावर माफी मागावी, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. नेटकरी टि्वटवर 'मेनका गांधी माफी मागा' या हॅशटॅगसोबत आँडियो क्लिपही शेअर करीत आहेत.

काय आहे हे प्रकरण

दिल्लीतल्या अंजली चौधरी यांच्या कुत्र्याच्या पायाचे आँपरेशन डॉ. विकास शर्मा यांनी केलं. ऑपरेशननंतर कुत्र्याच्या पायाला घातलेले टाके तुटल्याची तक्रार आली आहे. त्यानंतर मेनका गांधी या डॉ. शर्मा यांच्यावर भडकल्या. त्यांनी डॅा. शर्मा यांना फोन करुन शिवीगाळ केली. तसेच पशुवैद्यकीय डॉक्टराची पदवी रद्द करण्याची धमकी दिली आहे. तसेच हरामी, हरामजादे असे शब्द वापरल्याचे क्लिपवरुन दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT