Farmers_Protes 
देश

''शेतकरी आंदोलन हा तर प्रयोग, यशस्वी झाल्यास राम मंदिर, CAA ला विरोध होईल''

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर अनेक राज्यातील शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, पण अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यातच आता मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलंय की, शेतकरी आंदोलन एक प्रयोग आहे, पुढे आणखी आंदोलने केले जातील. एनएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

नरोत्तम मिश्रांनी म्हटलंय की, शेतकरी आंदोलन एक प्रयोग आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर लोक सीएए, एनआरसी, कलम ३७० आणि राम मंदिराच्या विरोधात आंदोलन सुरु करु शकतात. कोणालाही कळत नाहीये की कृषी कायद्यांमध्ये काळे काय आहेत. शेतकऱ्यांना याची भीती का वाटत आहे. भ्रामक कल्पनांवर आधारित शेतकऱ्यांचे आंदोलन उभारले गेले आहे. 

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या ७१ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा सुरु ठेवली आहे, पण कृषी कायदे रद्द करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारने कायद्यांमध्ये सुधारणांची तयारी दाखवली आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये तिढा कायम आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलन अधिक तीव्र केले आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी २६ जानेवारीला हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. पण काहीवेळातचं आंदोलनाने हिंसेचे स्वरुप घेतले. मोठ्या संख्येने शेतकरी ट्रक्टर घेऊन लाल किल्याकडे गेले. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही ठिकाणी आंदोलक शेतकरी पोलिसांवर चाल करुन गेल्याचं  पाहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनी झालेल्या या हिंसाचारामुळे देशाच्या प्रतिमेला गालबोट लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT