Lalan Paswan Sakal
देश

लक्ष्मीपूजनाने धन मिळालं असतं तर मुस्लीम...; भाजपा नेत्याचं विधान वादात; पुतळा जाळला!

हनुमान जर शक्तीची देवता आहे आणि शक्ती देतात. तर मुस्लीम किंवा ख्रिश्चन लोक ताकदवान नसतात का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा भाजपाचे नेते चर्चेत येत असतात. दिवाळीच्या तोंडावर असंच एक वादग्रस्त विधान भाजपाच्या एका आमदाराने केलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लक्ष्मीपूजनावरुन केलेल्या या विधानावरुन लोकांनी या नेत्याचा पुतळाही जाळला आहे.

बिहारमधल्या भागलपुरातल्या पीरपैंतीमधले भाजपा आमदार ललन पासवान यांनी हे विधान केलं आहे. पासवान म्हणाले, "जर लक्ष्मी पूजनाने धन मिळतं, तर मुसलमान अरबपती, खरबपती झाले नसते. सरस्वती विद्येची देवता आहे. मग मुस्लीम विद्वान झाले नसते, ते आयएएस, आयपीएस नसते." पुढे पासवान म्हणाले की, हनुमान जर शक्तीची देवता आहे आणि शक्ती देतात. तर मुस्लीम किंवा ख्रिश्चन लोक ताकदवान नसतात का? अमेरिकेत हनुमानाची पूजा होत नाही, तरीही तो शक्तिशाली देश कसा काय झाला?

पासवान पुढे म्हणाले, "तुम्ही मानलं तर देव आहे नाहीतर निव्वळ दगड. जोपर्यंत तुम्ही मानता, तोवरच हे आत्मा परमात्मा आहे. मानणं बंद केलं तर बौद्धिक क्षमता वाढेल. असं काही मानण्यापेक्षा तुमच्या तर्कशक्तीने विचार करा. वैज्ञानिक विचार करा." पासवान यांच्या या विधानानंतर त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतप्त लोकांनी शेरमारी चौकामध्ये पासवान यांचा पुतळा जाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

SCROLL FOR NEXT