alka lamba, sonu sud, BJP, Congress 
देश

'PM अन् CM तुमचेच असताना बॉलीवूड स्टारकडे मदत मागणे लाजीरवाणे'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाउनच्या दरम्यान स्थलांतरित मजूरांच्या मुद्यावरुन सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात चांगलेच राजकारण रंगल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील वाद-विवाद थांबतो ना थांबतो तोवर आता याप्रकरणात काँग्रेसच्या नेता अलका लांबा यांनी उडी घेतील आहे. मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मजूरांच्या मदतीसाठी चक्क बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदत मागितली आहे. याच मुद्यावरुन अलका लांबा यांनी त्यांच्यावर शाब्दिक तोफ डागत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. 

मध्य प्रदेशचे आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईमध्ये अडकलेल्या मध्य प्रदेशातील मजूरांच्या मदतीसाठी सोनू सूद याच्याकडे मदतीची याचना केली होती. यावर अलका लांबा म्हणाल्या आहेत की, देशात आणि राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असताना अशा पद्धतीने मदतीचे याचना करणे लाजीरवाणी गोष्ट आहे. मजूरांना मदत देण्यास असमर्थ असाल तर राजीनामा द्या, अशी मागणीही अलका लांबा यांनी केली आहे.  
अलका लांबा यांनी भाजप आमदाराने सोनू सूद याच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मागितलेल्या मदतीसंदर्भातील पोस्टचा स्क्रिन शॉट आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केलाय.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, राज्यात आणि देशात आपल्या पक्षाची सत्ता असताना स्वत: आमदार आणि माजी मंत्र्याने बॉलीवूड अभिनेत्याकडे मदत मागण्याच्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. देशाचे पंतप्रधान हे तुमचे आहेत. राज्यातही तुमचेच सरकार आहे. महाराष्ट्र राज्यातही तुमचे आमदार आमदार खासदार आहेत. त्यांच्याकडे मदत न मागता सोनू सूद यांच्याकडे मदतीची याचना करणे लाजीरवाणे आहे. मजूरांची जबाबदारी घेणे शक्य नसेल तर राजीनामा द्या, असा उल्लेख अलका लांबा यांनी भाजपच्या आमदाराला उद्देशून केलाय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT