BJP MLA
BJP MLA 
देश

काश्मीरमधील गोऱ्या मुलीशी आता कोणीही विवाह करू शकतं: भाजप आमदार

वृत्तसंस्था

मुजफ्फरनगर : जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करत आता काश्मीरमधील गोऱ्या मुलीसोबत कोणीही विवाह करू शकेल, असे म्हटले आहे.

केंद्रातील भाजप भाजप सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये आता भारतातील इतर राज्यातील नागरिकांना व्यवहार करता येणार आहेत. यावरून भाजप आमदाराने केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सैनी म्हणाले, की पक्षातील कार्यकर्ते सध्या आनंदात आहेत. कारण, त्यांना काश्मीरमधील गोऱ्या मुलींशी विवाह करता येणार आहे. पक्षातील अविवाहीत कार्यकर्त्यांची आता तेथे जाऊन लग्न करू. तेथील महिलांवर आगोदर खूप अत्याचार होत होते. आता तेथील मुलीने उत्तर प्रदेशातील कोणत्याही मुलासोबत लग्न केले तर तिचे तिकडचे नागरिकत्व रद्द होत होते. पण, आता काश्मीरमधील गोऱ्या मुलींनी आनंद साजरा करायला पाहिजे की त्यांना आता भारतातील कोणत्याही मुलाशी लग्न करता येणार आहे. मग तो हिंदू असो की मुस्लिम. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT