Asaduddin Owaisi esakal
देश

'मोदी, योगीजी मरण्यापूर्वी तुम्ही जिवंत राहाल का?'

सकाळ डिजिटल टीम

'योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार?'

सध्या सोशल मीडियावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पोलिसांना धमकी दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळं वाद निर्माण झालाय. ओवेसी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election) एका प्रचारसभेत पोलिसांना धमकीवजा इशारा दिल्याचा आरोप आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांनी ओवैसींनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

उत्तर प्रदेशातील मुस्लिमांवर (Muslim) पोलिसांकडून (UP Police) अत्याचार होत असल्याचे सांगत ओवैसी यांनी या प्रचारसभेत पोलिसांना धमकी दिल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याचा आरोप आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे नेहमी मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नेहमी पंतप्रधान राहणार नाहीत. मुस्लिमांवर पोलिसांकडून अत्याचार होत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही. हा अन्याय आम्ही लक्षात ठेवू. तुम्हाला अल्लाह त्याच्या शक्तीनं नष्ट करेल. परिस्थिती बदलणार आहे. योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार?, असं ओवेसी म्हणाल्याचा दावा विरोधक करताहेत.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार टी राजा म्हणाले, मृत्यू प्रत्येक माणसाला येतो. पण, मोदीजी आणि योगीजी मरण्यापूर्वी तुम्ही जिवंत राहाल का?, असा थेट सवाल त्यांनी ओवैसींना केलाय. ते पुढे म्हणाले, कलम 370 हटवण्याचं आमचं स्वप्न होतं, ते आम्ही साध्य केलंय. आम्हाला अयोध्येत राम मंदिर हवं होतं, तेही आता झालंय, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, ओवेसी यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण होणारा वाद पाहून स्पष्टीकरण दिलंय. आपल्या भाषणातील काही भाग काढून व्हायरल करत चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा ओवेसी यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

हरिहरेश्वर मंदिरात रक्तरंजित थरार! आईने पोटच्या मुलीवर केला धारदार शस्त्राने वार; स्वतःला संपवून घेण्याचाही प्रयत्न

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

SCROLL FOR NEXT