kaushal kishore 
देश

भाजप खासदाराच्या सुनेचा नस कापून आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओद्वारे मांडलं गाऱ्हाणं

सकाळवृत्तसेवा

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज मतदार संघातून भाजपचे खासदार कौशल किशोर यांच्या परिवारातील हायव्हाल्टेज ड्रामा अजूनही सुरु आहे. आता खासदाराच्या सुनेने त्यांच्या घरी जाऊन आपल्या हाताची नस कापली आहे. आत्महत्येचा हा प्रयत्न करण्याआधी खासदाराच्या सुनेचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात तिने म्हटलंय की, मी आता जीव द्यायला जातीय. भाजपचे खासदार कौशल किशोर यांची सून अंकिताने त्यांच्या घराच्या बाहेर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. याआधी अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिने आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं तसेच तिचे पती आयुष याच्यावर गंभीर आरोप केले होते. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

अंकिताने या व्हिडीओत म्हटलंय की, मी कुणाशीही लढू शकत नाही कारण तुझे वडील खासदार आणि आई आमदार आहे. माझं कुणीच ऐकणार नाही. मी आजपर्यंत कुणालाही तुला हात लावू दिलं नाही तर मी तुला कशी मारु शकते? तू किती खोटं बोलतोयस, तू आणि तुझ्या घरच्यांनी माझं जगणं अवघड केलंय. पुढे अंकितने म्हटलंय की, घराचे भाडे दिले नाही, गॅस सिलेंडर भरला नाही. एकदा देखील विचार केला नाही की, मी काय खाईन? जर तुला माझ्याजवळ यायचं नसेल तर मला रहायचं देखील नाहीये. मी जात आहे. तू मला आठवशील आणि विचार करशील की माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणार तुला दुसरं कुणीही मिळणार नाही. माझ्या मृत्यूचं कारण तू आहेस आणि तुझे घरचे लोक आहेत. मी जात आहे. 

हेही वाचा - बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला रघुराम राजन यांची साथ; मोदी सरकारच्या धोरणावर टीका
या प्रकरणी भाजपचे खासदार कौशल किशोर यांनी म्हटलंय की, तिला तुम्ही माझी सून म्हणू नका. तिने आणि आयुषने जे लग्न केलं ते मला कधीच मान्य नव्हतं. अंकिता मला आणि माझ्या परिवाराला बदनाम करत आहे. अंकिताच्या मागे कुणीतरी आहे जे तिला हे करायला प्रोत्साहन देत आहे. ती नाटक करत आहे. खासदार कौशल किशोर यांचा फरार मुलगा आयुषने एक व्हिडीओ  जाहीर करत आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं की, त्याला पत्नी अंकिता सिंहने फसवलं आहे. त्याने म्हटलंय की तो सरेंडर करेल. त्याने कुठलं चुकीचं काम केलं नाहीये. त्याने स्वत:वर गोळी चालवली नाहीये. जर तो त्या दिवशी घरी असता तर त्याची हत्या झाली असती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT