Mahua Moitra  
देश

Mahua Moitra:'अदानींविरोधात प्रश्न विचारण्यासाठी 'या' उद्योजकाने दिले पैसे', भाजप खासदाराचा महुआ मोईत्रांवर आरोप

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या कडून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईत्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

Manoj Bhalerao

Nishikant Dubey on Mahua Moitra: भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या कडून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईत्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आणि महुआ यांच्यावर निलंबणाची कारवाई करावी, अशी मागणी केली. लोकसभेत काही प्रश्न विचारावेत यासाठी उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्यात आर्थिक आणि भेटवस्तुंच्या माध्यमातून देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दुबे यांनी ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलय की, "मला जय अनंत देहद्राई यांच्याकडून पत्र प्राप्त झालं, ज्यात त्यांनी पुरावा दिलाय की लोकसभेत प्रश्न विचारावेत यासाठी लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा आणि उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली. मोईत्रा यांनी विचारलेल्या ६१ पैकी ५० प्रश्नांमध्ये हिरानंदानी यांचा फायदा होईल अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता.

पुढे दुबे म्हणाले की, "मोईत्रा यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी गौतम अदानी हे होते. ज्यांच्याविरोधात हिरानंदानी हे व्यापार मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आरोप लावले होते."

यापुढे दुबे म्हणाले की, "जेव्हाही लोकसभेचं कामकाज सुरु असतं, तेव्हा महूआ मोईत्रा आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे नेते लोकसभेत गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. उद्योजकांकडून पैसे मिळवण्यासाठी ते असं करतात." (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT