Farmers Protest Team eSakal
देश

भाजप नेत्याचं आक्षेपार्ह वक्तव्य; आंदोलक शेतकऱ्यांनी फोडली गाडी

भाजप नेत्याने हा खूनाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

सुधीर काकडे

हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एका गटाने घोषणाबाजी करत भाजपचे राज्यसभेचे खासदार रामचंद्र जांगरा यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी झटापट झाली. या वादात खासदार जांगरा यांच्या गाडीची काच फुटली. या घटनेनंतर आता मोठा वाद निर्माण झाला असून, भाजप खासदारा जांगरा यांनी या घटनेला खुनाचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजपचे खासदार रामचंद्र जांगरा आज नारनौंद शहरात धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी गेले असता ही घटना घडली आहे. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यानंतर ही घटना घडली. हा खूनाचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार जांगरा यांनी केला आहे.

हिस्सार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खासदार रामचंद्र जांगरा यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमाजवळ पोहोचून तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत काळे झेंडे दाखवून निदर्शनं केली. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याने, पोलिसांसोबत शेतकऱ्यांची मोठी झटापट झाली. शेतकर्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांनी परिसरात जोरदार नाकेबंदी केली होती, मात्र पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही.

खासदार जांगर यांना काल रोहतकमध्ये अशाच निषेधाचा सामना करावा लागला होता. दिवाळीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते रोहतकमध्ये गेले असताना त्यांनी आंदोलक शेतकर्‍यांवर केलेल्या टिप्पणीमुळे हिस्सारमध्ये निदर्शने सुरू झाल्याचे दिसते आहे. या कार्यक्रमात त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना "बेरोजगार मद्यपी" म्हटले होते. तसेच त्यांनी शेतकरी आंदोलनात कोणीही शेतकरी नसल्याचा आरोप केला होता. त्यांनंतर आज शेतकऱ्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जांगरा यांना पाठिंबा देत उपस्थितांकडून देखील घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, आपला कार्यक्रम संपल्यानंतर, दुसर्‍या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना, काही लोकांनी माझ्या कारवर लाठ्या फेकल्या, त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. कोणालाही दुखापत झाली नाही. जांगरा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, या घटनेबाबत मी हरियाणाचे डीजीपी आणि एसपी यांच्याशी या घटनेबद्दल बोललो असल्याचे सांगितले. हा आपल्या खुनाचा प्रयत्न असून, दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT