sadhvi pragya 
देश

दररोज गोमूत्र पिते, म्हणून कोरोना झाला नाही- साध्वी प्रज्ञा

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाची खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी दावा केलाय की, गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचे इन्फेक्सन बरे होते. त्यांनी असंही सांगितलं की, गोमूत्रच्या सेवनाने कोरोना होत नाही. त्यांनी स्व:ताचे उदाहरण देताना सांगितलं की, त्या नियमितपणे गोमूत्राचे सेवन करायच्या, याचमुळे त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. 'लाईव्ह हिंदूस्तान'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (bjp mp sadhvi pragya singh thakur claims cow urine cure lungs infection coronavirus)

प्रज्ञा सिंह ठाकुर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना दिसत आहेत. कार्यक्रमात प्रज्ञा सिंह म्हणतात की, देशी गायचे मूत्र आपण घेतले, तर यामुळे फुफ्फुसाचे इन्फेक्सन दूर होते. मी सध्या खूप त्रासात आहे, पण मी दररोज गोमूत्र घेते. त्यामुळे मला कोरोनावर उपाय म्हणून इतर कोणतं औषध घेण्याची गरज पडत नाही. मला कोरोनाही झाला नाही. गायीचे मूत्र आपल्यासाठी जीवनदायी असते.

साध्वी प्रज्ञा यांना रविवारी बैरागडमध्ये ऑक्सिजन कॉन्सेंटेटर मशीनच्या पूजन कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केलंय. त्या असंही म्हणाल्या की, काही लोक त्यांना बेपत्ता म्हणत बक्षीस घोषित करत आहेत. हा एक संविधानिक गुन्हा आहे. देव त्यांना शिक्षा देईल. आजारी असूनही मी घरूनच लोकांची मदत करत आहे.

गो मूत्रामुळे कँसर नष्ट होत असल्याचा केला होता दावा

साध्वी प्रज्ञा आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. त्या भोपाळमधून भाजप खासदार आहे. त्यांनी यापूर्वी असाही दावा केलाय की, गायचे मूत्र आणि इतर उत्पादनापासून ब्रेस्ट कँसर दूर केला जाऊ शकतो. त्या एप्रिल २०१९ मध्ये म्हणाल्या होत्या की, मी कँसर पीडित होते, तेव्हा गोमूत्र आणि पंचगव्य मिश्रित आयुर्वेदिक औषधांनी मला कँसरमधून बरं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT