bjp meeting sakal media
देश

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक; ठरणार निवडणुकांची रणनीती

भारतीय जनता पक्षाच्या‌ राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आज दिल्लीत सुरु झाली.

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या‌ राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आज दिल्लीत सुरु झाली. देशभरात भाजप कार्यकर्त्यांची बांधणी करण्याबरोबरच आगामी काळातील निवडणुकांसाठी रणनीती या बैठकीत आखली जाणार आहे.

दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. बी.एल. संतोष, महाराष्ट्रातून विनोद तावडे, पंकजा मुंडे, तसेच दुष्यंत गौतम, अरविंद मेनन, अनिल बलुनी, दिलीप घोष, अनुपम हाजरा, बैठकीत सहभागी होण्यासाठी आले आहेत.

जेपी नड्डा भाजपच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि पक्षाच्या मोर्चा प्रमुखांना केंद्र सरकारच्या यशाची माहिती, पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकांपर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. याद्वारे भाजप आगामी निवडणूक प्रचाराला प्रारंभ करीत असल्याचे मानले जात आहे.

दिवसभर चालणाऱ्या या बैठकीबाबत पक्षाचे नेते रमणसिंह म्हणाले, "आगामी निवडणुकांसाठी रणनीती या बैठकीत आखली जाणार आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी पदाधिकाऱ्यांबरोबर दीर्घ चर्चा केली. त्यानुसार बैठकीत धोरणे आखली जातील. धोरणांची अंमलबजावणी कशी करायची हेही निश्चित होणार आहे."

‌विरोधी पक्ष कोविड काळात भीतीचे वातावरण निर्माण केले. पण केंद्राने सामान्य लोकांपर्यंत अन्य धान्य पोचविले याबद्दल सुरवातील जे. पी. नड्डा यांनी बैठकीत दिली. जनतेचे सेवाकार्य हे अशाच पद्धतीने सुरू ठेवण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसला १९६७ पासून उतरती कळा लागली आहे. त्याचे कारण कार्यकर्ते सक्रीय राहिले नाहीत. त्यांना एकसंध ठेवणारा कार्यक्रम पक्षाकडे राहिला नाही. भाजपने मात्र सातत्याने कार्यकर्त्यांना एकसंध ठेवत पक्षाला मजबूत ठेवले. यापुढील काळातही पक्ष कार्यकर्त्यांची बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT