देश

नड्डांची भाजप नेत्यांशी चर्चा;पक्षांतर्गत मतभेद मिटविण्याची सूचना 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काल विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या महाराष्ट्र व राजस्थानातील भाजप नेत्यांशी स्वतंत्र फेऱ्यांद्वारे चर्चा केली. या चर्चेचे तपशील कळलेले नसले तरी प्रामुख्याने राज्य पातळीवरील पक्षांतर्गत मतभेद कमी कसे करायचे आणि त्याचबरोबर राज्याची एकंदर राजकीय परिस्थिती या मुद्यांवर प्रामुख्याने विचारविनिमय झाल्याचे समजते. 

नड्डा यांनी  काल प्रथम राजस्थानातील भाजप नेत्यांबरोबर दीर्घ चर्चा केली. सुमारे दोन तास ही चर्चा झाली. यानंतर सायंकाळी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, महाविकास आघाडीचा एकंदर राज्यकारभार याबाबत चर्चा केल्याचे समजते. याच बरोबर महाराष्ट्रात भाजपअंतर्गत असलेल्या मतभेदांची दखल घेऊन त्यांनी ते कमी करण्याबाबत पावले उचलण्याची सूचना या नेत्यांना केल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या चर्चेत सहभागी झाले होते. सरचिटणीस व्ही.सतीशही यावेळी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT