Mamata Banerjee esakal
देश

बंगालला लूटून पक्ष विस्ताराचा प्रयत्न,भाजपची ममता बॅनर्जींवर टीका

'ममता बॅनर्जींबरोबर कोण आहेत? आता त्या महाराष्ट्रात गेल्या आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : ममता बॅनर्जींबरोबर कोण आहेत? आता त्या महाराष्ट्रात गेल्या आहेत. ही चांगली बाब आहे. बंगालमध्ये जो हिंसा आणि हत्येचे राजकारण होत आहे. त्याचे पाप धुण्यासाठी त्यांना संधी हवी, असा टोला भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee Visit Mumbai) यांना लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. घोष पुढे म्हणाले, मला नाही वाटत की त्यांना कोणताही मोठा नेता भेटलं. सर्व नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखले आहे. ममता बॅनर्जी सगळ्यांवर वर्चस्व गाजविण्याचे राजकारण करित आहेत. त्या गोवा, हिमाचल किंवा उत्तर प्रदेश कुठेही गेल्या तरी त्यांना त्याचा काहीच फायदा मिळणार नाही. बंगालला लुटून पूर्ण देशात तृणमूल काँग्रेस पक्षाचा (Trinmool Congress) विस्तार करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्याने बंगालचे लोक आनंदी नाहीत, असा आरोप दिलीप घोषण यांनी बॅनर्जी यांच्यावर केला आहे.

ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी (ता.३०) त्यांचे मुंबईत आगमन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणामुळे बॅनर्जी यांना भेटू शकले नाहीत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आज बुधवारी (ता.एक) त्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत आहेत. पश्चिम बंगाल बाहेर तृणमूलचा विस्ताराचा एक भाग म्हणून बॅनर्जी यांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT