bjp offered money to mla cm arvind kejriwal allegations politics esakal
देश

Arvind Kejriwal : भाजपकडून आमदारांना आमिष; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा गंभीर आरोप

आपच्या आमदारांना २५ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आपच्या आमदारांना २५ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले, भाजपने मला अटक करण्याची पूर्ण योजना आखली आहे.

भाजपने आपच्या सात आमदारांना २५-२५ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले आहे. मला अटक केल्यानंतर आपचे २१ आमदारांना फोडले जाईल. तसेच इतर आमदारांना सुद्धा आमिष दाखविले जाईल. या २१ आमदारांना भाजपची उमेदवारी दिली जाईल, असे आमिष भाजपकडून आपच्या आमदारांना दिले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे.

आपच्या ज्या ७ आमदारांशी भाजपने संपर्क केला. त्या आमदारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ कथित उत्पादन शुल्क गैरव्यवहारप्रकरणी मला अडकवले जात नाही, तर दिल्लीतील आपचे सरकार पाडण्यासाठीच अटकेचे षडयंत्र आखले जात आहे. परंतु अद्यापही त्यांना यात यश मिळाले नाही.

दिल्लीतील जनतेला आपने केलेल्या कामाची पूर्ण जाणीव आहे. केंद्र सरकारने निर्माण केलेल्या अनेक अडचणींचा सामना करीत दिल्लीतील अनेक विकास कामांना गती दिली आहे. दिल्लीतील जनतेंनी मला खूप प्रेम दिले आहे. दिल्लीतील लोकप्रिय सरकार केंद्र सरकार षडयंत्र करून पाडण्याचे स्वप्न पाहत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT