rajnath singh 
देश

भाजपच्या प्रचारात 'गांगुली'; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगायला लागला आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या दोन्ही प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान, मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी प्रचारात भाग घेतला. यावेळी त्यांच्या प्रचारात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा उल्लेख झाला.

पुणे : क्वारंटाइन सेंटरमधून तरुणीचा पळून जाण्याचा प्रयत्न; पण घडलं भलतंचं! 

राजनाथ म्हणाले, "जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) खेळपट्टीच्या बाहेर यायचा तेव्हा तो षटकार ठोकणार हे निश्चित असायचं. त्याचप्रमाणे भाजपही पश्चिम बंगालच्या राजकारणातील खेळपट्टी बाहेर आला असून विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे षटकार ठोकेल आणि सरकार स्थापन करेल." 

सौरव गांगुली भाजपत दाखल होणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हे विधान केलं आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळवेल. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश हे पश्चिम बंगालमध्ये बदल घडून येण्याच द्योतकं आहे, असंही संरक्षण मंत्री एका सभेत संबोधित करताना म्हणाले.

पुणे : 'जगदंबा तलवार परत आणा'; कोल्हापूरचे तरुण घुसले गहुंजे मैदानात 

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करताच निवडणूक लढवणं भाजपला महागात पडेल का? या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ म्हणाले, "भाजपला काही फरक पडणार नाही, कारण आमचा पक्ष हा लोकशाही पक्ष आहे. त्यामुळे आमचे निवडून आलेले आमदार त्यांचा नेता निवडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: सत्तारांचे पंख छाटण्यासाठी भाजपचा पहिला वार!;अब्दुल समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद, स्वप्न भंगले; शिवसेनेच्या आमदार जाधव, अण्णासाहेब माने यांनाही धक्का

Latest Marathi News Live Update : अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर

Beed: दलदल, चिखलातून काढावा लागतोय मार्ग ;रस्ते चिखलात; पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाविकांना फटका

Sangli Satara Election: स्वाभिमान दाखविल्यास निकाल बदलेल: जयंत पाटील, शशिकांत शिंदे; नाराजांची मदत घेणार, दोन्ही राजांनी स्वाभिमान दाखवावा

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

SCROLL FOR NEXT