Amit Shah 
देश

Loksabha 2019 : 'खरे' नाही, तरी 'बरे' बोला; अडवानी, जोशींकडून शहांची अपेक्षा 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपचे संस्थापक लालकृष्ण अडवानी व मुरलीमनोहर जोशी यांची पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. चर्चेचा सारा तपशील कळू शकला नाही, तरी किमान लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी दोघांनी भाजपच्या वर्तमान सर्वेसर्वा नेतृत्वाबद्दल "खरे' नाही तरी "बरे' बोलावे वा मौनव्रत सुरू ठेवावे, अशी "नम्र अपेक्षा' दोघाही ज्येष्ठांच्या कानावर घालण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

संघात असलेली 75 वर्षांची निवृत्तीची अट भाजपमध्ये केवळ कर्नाटकातील बी. एस. येडियुरप्पा यांच्यासाठी शिथिल करणाऱ्या पक्षनेतृत्वाने लोकसभेवेळी मात्र अडवानी व जोशी यांच्यासह सुमित्रा महाजन, कलराज मिश्रा, बी. सी. खंडुरी, कारिया मुंडा आदींची तिकिटे कापली. यातील जोशी व सुमित्रा महाजन यांनी संयत शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, अडवानी यांनी थेट ब्लॉगच लिहून भाजपच्या संस्कृतीचे पाठ देऊन आरसा दाखविला. भाजपला सत्तेचा सोपान दाखविणाऱ्या व एकेकाळी नरेंद्र मोदी यांची भक्कम पाठराखण करणाऱ्या अडवानींच्या ब्लॉगची दखल राष्ट्रीय व जागतिक माध्यमांनी घेतल्यामुळे भाजप सरकारच्या नेतृत्वात अस्वस्थता पसरली. कॉंग्रेसकडून याचे भांडवल करण्याच्या प्रयत्नाला जनतेकडून दाद मिळत असल्याचे लक्षात आल्यावर ही अस्वस्थता अधिकच वाढली. याआधी रामलाल वा विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून साऱ्या वरिष्ठांना "आता पुरे' असा मेसेज देण्यात आला होता. मात्र, अडवानींच्या ब्लॉगनंतर शहा यांनीच दोघांच्या घरी पायधूळ झाडावी अशी शक्कल लढविण्यात आली व त्या योजनेनुसार शहा दोघांकडेही पोहोचले. 

"संकल्पपत्रा'तही नाही 
भाजपचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा जाहीर होण्याच्या समारंभात अडवानी व जोशी व्यासपीठावर काय; पण श्रोत्यांतही नाहीत असा 1980 पासूनचा पहिला कार्यक्रम आज पार पडला. अडवानी व जोशी यांच्या छायाचित्रांनाही पक्षाच्या संकल्पपत्रात स्थान मिळालेले नाही. आजच्या कार्यक्रमात संसदीय मंडळातील नितीन गडकरी यांची अनुपस्थितीतही अनेकांना खटकली. गडकरी यांनी तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर "जो घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार' यासह अनेक स्फोटक वक्तव्ये केली होती, त्यामुळे ते पक्षनेतृत्वाच्या ब्लॅक लिस्टमध्ये गेल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram ला जन गण मनसारखा दर्जा मिळणार... सरकार नवे नियम करण्याच्या तयारीत!

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी तरुणाला अंगावर वळ उमटेपर्यंत बदडले; दोन पोलिसांचे कृत्य, निलंबनाची कारवाई!

Latest Marathi news Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लग्नाच्या तयारीवेळी पलाश दुसऱ्या तरुणीसोबत बेडवर सापडला, स्मृतीच्या टीममेट्सनी तिथंच धुलाई केली; अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

Kolhapur–Mumbai : प्रवासी वाढले, गाड्या कमीच; कोल्हापूर–मुंबई मार्गावर रेल्वेची टंचाई तीव्र, प्रवाशांकडून होतीय नव्या रेल्वे मागणी

SCROLL FOR NEXT