bjp rajyasabha mp aditya kumar on waiting ticket not getting confirm indian railways marathi news rak94 
देश

Railway Waiting Ticket : खासदार असूनही रेल्वेचं तिकीट होईना कन्फर्म! भाजपच्या नेत्यांने राज्यसभेत मांडलं दु:ख

BJP rajyasabha mp aditya kumar on Indian Railway Coaches : देशात रेल्वे प्रवास करणे एक कसरतीचं काम आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर गर्दीने खच्च भरलेल्या रेल्वे डब्यांचे फोटो व्हायरलं झाले होते.

रोहित कणसे

देशात रेल्वे प्रवास करणे एक कसरतीचं काम आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर गर्दीने खच्च भरलेल्या रेल्वे डब्यांचे फोटो व्हायरलं झाले होते. एक्सप्रेस ट्रेन्समध्ये जनरल आणि स्लीपर कोचच्या कमतरतेची देखील खूप चर्चा झाली. परिस्थिती इतकी बिकट बनली की चक्क खासदाराच्या वशील्यानंतर देखील लोकांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नव्हते. हीच खंत भाजपच्या एका खासदाराने थेट संसदेत बोलून दाखवली आहे.

रेल्वे प्रवाशांची ही अडचण गुरूवारी म्हणजेच २५ जुलै रोजी संसदेच्या पावसाठी अधिवेशनात मांडण्यात आली. विशेष म्हणजे हा मुद्दा विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी पक्ष भाजपचे नेते झारखंडचे राज्यसभा खासदार आदित्य कुमार यांनी शून्य प्रहरदरम्यान सभाग्रहात उपस्थित केला.

राज्यसभेत बोलताना भाजपचे खासदार आदित्य कुमार म्हणाले की, त्यांच्या भागात दररोज रेल्वेचे तिकीट न मिळाल्याच्या तक्रारी येत आहेत. आपलं दुखः मांडताना त्यांनी सांगितलं की, त्यांनी पत्र लिहून शिफारस केली तरी देखील प्रवाशांचे तिकीट कंन्फर्म होत नाही, ज्यामुळे गावातील लोक, गरीब, शेतकरी, सोशित वर्गाला रेल्वेमधून प्रवास करता येत नाही. त्यांनी सांगितलं की रेल्वे प्रवास सोपा आणि स्वस्त आहे म्हणून लोक त्याने प्रवास करणे पसंत करात मात्र तिकीट कंन्फर्म होत नाही म्हणून त्यांना प्रवास करता येत नाही.

आदित्य कुमार म्हणाले की, नवीन रेल्वे सुरू केल्या जात आहेत. नव्या रेल्वेमार्गांसाटी रेल्वे लाईन टाकण्याचं काम देखील वेगाने सुरू आहे. पण तेवढ्याच वेगाने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे लोकांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाहीयेत. लोक तिकीटाच्या वेटिंग लिस्टमध्येच अडकून पडत आहेत आणि रेल्वेने प्रवास करू शकत नाहीयेत.

राज्यसभेचे खासदार पुढे म्हणाले की, ज्या वेगाने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे त्या प्रकारे बोगींची संख्या वाढताना दिसत नाही, आणि बोग्यांच्या कमतरतेमुले लोक प्रवास करु शकत नाहीयेत आणि वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाहीत. आदित्य कुमार यांनी रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांच्याकडे स्लीपर क्लास बोग्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली, जेणेकरून लोक आरामात रेल्वे प्रवास करु शकतील.

रेल्वे प्रवाशांना होत असलेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर जुलैच्या पहिल्या आठवज्यात रेल्वे मंत्र्यांनी माहिती धिली होती की विशेष अभियानाच्या अंतर्गत तब्बल १० हजार कोचच्या उभारणीस मंजूरी देण्यात आली आहे. हे कोच जनरल ट्रेन्सना जोडण्यात येतील, त्यांनी सांगितले की जनरल रेल्वेची वाढती मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुविधाजनक आणि आरामदायक होऊ शकेल. यापैकी आर्धे कोच २०२५ पर्यंत आणि उरलेले आर्धे २०२६ प्रर्यंत जोडण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याशिवाय ५० आणि अमृत भारत ट्रेन्सची उभारणी सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT