ramesh bidhuri  
देश

BJP MP: रमेश बिधुरींना भाजपने दिली नवी जबाबदारी; त्यांना बक्षीस मिळालं.. दानिश अलींची टीका

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बोलताना बसपचे खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यांच्याबाबत जातीवाचक शब्दांचा उल्लेख केला होता. त्यामुळे देशात मोठा वाद निर्माण झाला. माहितीनुसार, रमेश बिधुरी यांना भाजपकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. (BJP's Ramesh Bidhuri Gets New Role)

रमेश बिधुरी यांना राजस्थानच्या टोंक जिल्ह्याची निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये चार विधानसभेच्या जागा आहे. यातील एका जागेवर माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट आमदार आहेत. बिधुरी हे गुर्जर समाजाचे नेते आहेत.या भागात गुर्जर समाजाचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना टोंक जिल्ह्यात जबाबदारी देण्यात आल्याचं कळतंय.

बुधवारी बिधुरी यांनी जयपूरमधील पक्षाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीचे अध्यक्षपद राज्याचे प्रमुख सीपी जोशी यांच्याकडे होते. बिधुरी यांना भाजपकडून नवी जबाबदारी देण्यात आल्यानंतर दानिश अली यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सदर घटनेने मी पू्र्णपणे धक्क्यामध्ये आहे, असं ते म्हणाले. भाजपने आपला खरा चेहरा दाखवला असंही ते म्हणाले.

माझ्याविरोधात अत्यंत खालच्या शब्दांत टीका करण्यात आली. पण, मी एकही शब्द वाईट बोललो नाही. संसदेची पवित्रता जपली जावी म्हणून मी कसलेही प्रत्युत्तर दिलं नाही. माझ्या समाजाविषयी त्यांनी चुकीच्या शब्दांचा वापर केला. भाजप आता त्यांना नवी जबाबदारी देत आहे. यातून चुकीचा संदेश जात असल्याचं ते म्हणाले.

रमेश बिधुरी यांना टोंकची जबाबदारी दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खासदार कपिल सिब्बल म्हणाले की, संसदेतील कृत्यासाठी बिधुरी यांना भाजपने बक्षीस दिलं आहे. भाजपने द्वेषाला बक्षीस दिलंय. त्यामुळेच त्यांना टोंक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असं ते म्हणाले. टोंक जिल्ह्यात एकूण ३० टक्के मुस्लिम समाज आहे. राजकीय ध्रुविकरणासाठी त्यांना जबाबदारी दिलीये, असा आरोपही सिब्बल यांनी केलाय.

तृणमूलच्या खासदार महुआ मौईत्रा यांनी एक्सवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पोस्टमध्ये टॅग करत प्रश्न विचारला की, अल्पसंख्याक लोकांसाठी हीच तुमची स्नेह यात्रा आहे का? जशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती, त्याप्रमाणे त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT