Madhya Pradesh Election 
देश

Madhya Pradesh Election: भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील 2 नेत्यांचा समावेश

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. भाजपने नुकतेच मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात ४० नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांची नावेही या यादीमध्ये आहेत. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे.(BJP releases a list of 40 star campaigners for Madhya Pradesh Elections 2023)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशातील स्टार प्रचारक आहेत. भाजपने जाहीर केलेल्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे प्रमुख प्रचारक असणार आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर यांच्यासह चाळीस स्टार प्रचारक भाजपकडून निवडण्यात आले आहेत.

मध्य प्रदेश निवडणूक

मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात १७ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT