BJP Releases Poll Manifesto Esakal
देश

BJP Releases Poll Manifesto: मोदी की गॅरंटी! जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

Lok Sabha Election 2024 : आज भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जाणून घेऊया मोदींच्या १० मोठ्या घोषणा

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचे संकल्प पत्र या नावाने भारतीय जनता पक्षाने (BJP) आपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

पंतप्रधान मोदी वारंवार सांगत आहेत की त्यांच्या मते देशात फक्त चार 'जाती' आहेत - तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. हे लक्षात घेऊन भाजपच्या निवडणुकीतील आश्वासनांमध्ये समाजातील या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोडमॅप सादर केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

रोजगार आणि उद्योजकतेभर देणार भर

मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार,

70 वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार, तृतीयपंथीयांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार

गरीबांसाठी चार कोटी घरे बांधणार

पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरापर्यंत पोहोचवणार

वीजबिल शून्य करण्यासाठी काम करणार, पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करणार

गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार

कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार, 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर

मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे

पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.

देशात आणखी तीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर बांधले जातील

पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल

आयटी, शिक्षण, आरोग्य, किरकोळ आणि पर्यटन क्षेत्रातील बचत गटांना प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT