Himachal Pradesh Assembly Election JP Nadda esakal
देश

JP Nadda : भाजप सरकार महिलांना देणार 33 टक्के आरक्षण, 8 लाख नोकऱ्या; पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध

'राज्यात सरकार आल्यास समान नागरी कायदा लागू केला जाणार आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'राज्यात सरकार आल्यास समान नागरी कायदा लागू केला जाणार आहे.'

शिमला : भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Himachal Pradesh Assembly Election) पक्षाचं संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध केलंय. पक्षानं महिलांसाठी स्वतंत्र संकल्प पत्र जारी केलं आहे.

राज्यात सरकार आल्यास समान नागरी संहिता लागू केली जाईल, त्यासाठी एक समिती स्थापन करून तिच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन भाजपनं आपल्या ठराव पत्रात दिलंय. याशिवाय, टप्प्याटप्प्यानं 8 लाख नोकऱ्यांची निर्मिती, 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचंही भाजपनं जाहिरनाम्यात म्हटलंय. तसेच मुख्यमंत्री योजनेंतर्गत पीएम किसान सन्मान निधीमध्ये (PM Kisan Samman Nidhi) वार्षिक 3000 जोडले जातील, असंही भाजपच्या ठराव पत्रात म्हटलंय.

सध्या या योजनेअंतर्गत केंद्राकडून 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. भाजपनं आपल्या संकल्प पत्रात म्हटलंय की, जर राज्यात सरकार स्थापन झालं तर हिमाचल प्रदेशातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं जाईल. वाहतूक आणि पायाभूत सुविधांबाबत 'शक्ती' नावाचा कार्यक्रम सुरू करण्याचं आश्वासन पक्षानं दिलंय. अतिरिक्त जीएसटी 12 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर भाजपचं राज्य सरकार उचलेल, असंही म्हटलंय. शहिदांच्या आश्रितांना आर्थिक मदत, तरुणांसाठी स्टार्टअप, बेकायदा मालमत्तांची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही भाजपनं आपल्या ठराव पत्रात दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT