

Ladki Bahin Yojana maharashtra Installment
esakal
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याबाबत राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. पुढील दोन दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.