BJP sakal
देश

यूपीमध्ये भाजपला धक्के; आणखी ३ आमदारांनी पक्ष सोडला

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सुरू झालेला राजीनाम्याचा फेरा वाढत चालला आहे

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी (assembly election) स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आणखी तीन आमदारांनी पक्ष सोडला (3 more MLAs left the party) आहे. कानपूर देहाट आणि बांदा येथील आमदारांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. शाहजहांपूरचे तिल्हारचे आमदार रोशनलाल वर्मा यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत सायकलवर स्वार झाले आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर कानपूर बिल्हौरचे भाजप आमदार भागवत सागर स्वामी प्रसाद यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तिन्ही आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. भाजप सोडल्यानंतर रोशनलाल वर्मा म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य जिथे जातील तिथे त्यांच्यासोबतच राहू. भाजप सरकारमध्ये आमची उपेक्षा झाली आहे. यूपीमध्ये भाजपचे नाही तर अधिकाऱ्यांचे सरकार आहे. लोकभवनात दोन तास बसायचे. रोशनलाल वर्मा यांनी मंत्री सुरेश खन्ना यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी (assembly election) भाजपमध्ये (BJP) सुरू झालेला राजीनाम्याचा फेरा वाढत चालला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आणखी तीन आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी आमदारांची नावे चर्चेत आली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य आणि नीरज मौर्य हे पक्ष सोडू शकतात. मात्र, अद्याप त्यांनी कहीही सांगितलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT