The Kashmir Files  esakal
देश

''भाजपने विवेक अग्निहोत्रींना यूट्यूबवर द काश्मीर फाइल्स अपलोड करण्यास सांगावे''

द काश्मीर फाइल्स हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून राजकारण तापलेले असताना, यात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील उडी घेतली आहे. द काश्मीर फाइल्स राज्यात करमुक्त करण्याच्या मागणीवरून भाजपावर हल्ला चढवत ते म्हणाले की, ‘द काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी भाजपाने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांना तो युट्युबवर अपलोड करण्यास सांगावे, असा सल्ला दिला आहे. राजधानीतही 'द काश्मीर फाईल्स' करमुक्त करण्याची मागणी केली. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वरील सल्ला दिला आहे.

"काश्मिरी पंडितांच्या नावावर काही लोकांनी करोडोंची कमाई केली आहे आणि तुम्ही फक्त पोस्टर लावत आहात," असे केजरीवाल विधानसभेत भाजपला उद्देशून म्हणाले. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, त्रिपुरा, गोवा आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी तो युट्युबवर अपलोड करावा सर्वांना मुक्तपणे पाहता येईल. त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करण्याची गरजच काय? असे म्हणत, विवेक अग्निहोत्रींनी हा चित्रपट युट्युबवर अपलोड केल्यास सर्वजण तो एका दिवसात पाहू शकतील, असेही केजरीवाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT