pm modi esakal
देश

भाजपने सरकारे पाडण्यासाठी 6,300 कोटी रुपये खर्च केले: अरविंद केजरीवाल

भाजपला "राज्य सरकारांचे सिरीयल किलर" असे म्हणले होते.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टिका केली आहे. ते "म्हणाले भाजपने देशात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार पाडण्यासाठी तब्बल 6,300 कोटी रूपये खर्च केले आहेत. जर ते केले नसते तर केंद्र सरकारला खाद्य पदार्थांवर GST लावायची वेळ आली नसते. केजरीवाल यांनी शुक्रवारी भाजपला "राज्य सरकारांचे सिरीयल किलर" असे म्हणले होते.

दिल्ली विधानसभेत बोलत असताना त्यांनी आरोप केले की पेट्रोल-डिझेल आणि जीएसटीच्या दरवाढीतून जमा झालेल्या पैशातून भाजपने आमदारांना विकत घेत आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पण भाजपवर हल्लाबोल केले आहे, ते "म्हणाले लोक महागाईवर नाराज आहेत, मात्र भाजप करोडो रूपये खर्च करून विरोधी पक्षातील आमदार विकत घेवून राज्यात सरकार अस्थिर करत आहे."

केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की “दही, ताक, मध, गहू, तांदूळ इत्यादींवर जीएसटी लावण्यात आला आहे. याच्यातून केंद्र सरकारला सुमारे 7,500 कोटी रूपये मिळाले आहेत. वेगवेगळ्या राज्यातील सरकार पाडण्यासाठी त्यातील 6300 कोटी रूपये खर्च केले आहेत. जर त्यांनी सरकार पाडली नसती तर गहू, तांदूळ, दही, यांसारख्या खाद्य पदार्थांवर GST लावण्याची गरज लागली नसती, आणि लोकांना पण महागाईचा सामना करावा लागला नसता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT