देश

स्वातंत्र्य ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वाने वक्तव्यावर भाजपच्या रुचीची सारवासारव

सकाळ डिजिटल टीम

भाजपची युवा मोर्चाची प्रवक्ता असलेल्या रुची पाठकने देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर आहे असं वक्तव्य एका मीडिया डिबेटमध्ये केलं होतं.

झाशी - भाजपची युवा मोर्चाची प्रवक्ता असलेल्या रुची पाठकने देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर आहे असं वक्तव्य एका मीडिया डिबेटमध्ये केलं होतं. यानंतर रुची पाठक मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. आता या प्रकरणावर तिने सारवासारव केली आहे. रुची पाठकने म्हटलं होतं की, भारताला अजुनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. देशाला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालं आहे. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला आहे असा दावाही रुचीने त्या कार्यक्रमात केला होता.

स्वातंत्र्य भाडेतत्वावर असल्याच्या वक्तव्यानंतर रुची ही व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीची टॉपर असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. आता तिने याबाबत स्पष्टीकरण दिलं असून तिचं म्हणणं आहे की ही माहिती तिला सोशल मीडियावरून मिळाली. यासाठी काही लेख आणि राजीव दिक्षित यांच्या वक्तव्यांचा उल्लेखसुद्धा रुचीने केला आहे.

भाजपच्या युवा मोर्चाची प्रवक्ता असलेल्या रुची पाठकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी टीका केली आहे. भाजपची बाजू मांडताना रुची पाठकने भारताला स्वातंत्र्य हे काँट्रॅक्ट बेसवर मिळालं असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसंच शपथसुद्धा ब्रिटिश कायद्याची घेण्यात आल्याचा दावा रुचीने केला होता.

स्पष्टीकरण देताना रुची म्हणाली की, जे काही वक्तव्य मी केलं ते हिट ऑफ द मूव्हमेंट होतं. देशवासियांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तसंच संविधानावर प्रश्न उपस्थित करणे असाही उद्देश नव्हता. सरकारच्या कामकाजावरसुद्धा आक्षेप नाही. ते माझं वैयक्तिक वक्तव्य होतं, कोणत्याही पक्षाच्यातीने नव्हतं. ज्या आधारे मी भाडेतत्त्वावर स्वातंत्र्याचा उल्लेख केला त्याचा संदर्भ चुकीच असू शकतो. मात्र मी काही ब्लॉग आणि राजीव दीक्षित यांच्या वक्तव्याच्या आधारावर तसं म्हटलं असंही रुचीने सांगितलं.

काँग्रेस नेते गौरव जैन यांनी यावरून टीका करताना भाजपवर निशाणा साधला. भाजपचे बहुतांश प्रवक्ते हे व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीतून ज्ञान मिळवतात. त्यांना इतिहासाशी काही देणं घेणं नसतं. त्यांचे सगळे काही खोट्याच्या आधारावरच आहे असंही जैन यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT