Amit Shah Visit Bihar
Amit Shah Visit Bihar esakal
देश

Bihar : लोकसभा-विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार; अमित शहांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

'नितीश आणि लालू दोघंही आता म्हातारे झाले आहेत.'

Amit Shah Visit Bihar : सीमांचल दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी (Amit Shah) आता नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत बिहारमध्ये कोणतीही युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं. 2024 च्या लोकसभा (Lok Sabha Election) आणि 2025 च्या विधानसभा निवडणुका (Bihar Assembly Election) भाजप स्वबळावर लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

अमित शहांनी बिहारमधील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतची परिस्थितीही स्पष्ट केली. किशनगंजमधील भाजपच्या बैठकीत शहांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की, 'आता नितीशकुमारांच्या एनडीएमध्ये पुनरागमनाला जागा नाही. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवणं हे भाजपचं एकमेव ध्येय आहे.' किशनगंजमध्ये अमित शाह यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. यामध्ये स्थानिक खासदार, आमदारांसह अन्य नेते उपस्थित होते.

'नितीशकुमारांच्या विश्वासघातकीचा बदला घेण्याची संधी'

बैठकीत शहा म्हणाले, नितीश यांच्या विश्वासघातावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, आगामी निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळवणं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली होईल याची आम्हाला खात्री करायची आहे. 2024 मध्ये आपण चांगलं काम केलं, तर 2025 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाहीय. बिहारमध्ये पूर्ण बहुमत मिळवणं हे भाजपसाठी आव्हानात्मक काम असल्याचंही शहांनी स्पष्ट केलं. यासाठी राज्यातील 72 हजारांहून अधिक बूथवर संघटन मजबूत करायचं आहे. यासोबतच राज्यातील सर्व 243 विधानसभा जागांवर सर्व खासदार आणि आमदारांना लक्ष्य ठेवावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Amit Shah Visit Bihar

'नितीश-लालू दोघंही आता म्हातारे झाले आहेत'

शुक्रवारी रात्री किशनगंजमध्ये भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर अमित शहांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप बिहारमध्ये मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सध्या आमचं लक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर आहे आणि या निवडणुकीनंतर लवकरच आम्ही मुख्यमंत्री चेहरा जाहीर करू आणि त्यानंतर स्वबळावर निवडणूक लढवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शहा पुढं म्हणाले, नितीश-लालू दोघंही बिहारची दिशाभूल करत आहेत. नितीशकुमार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुठंच दिसत नाहीयत. नितीश आणि लालू दोघंही आता म्हातारे झाले असून विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल, तर ते फक्त राहुल गांधी असतील, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT