Omar Abdullah 
देश

भाजपने दाढी करण्यासाठी उमर अब्दुल्लांना पाठविले 'रेजर'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमध्ये इंटरनेट सुरू होताच सध्या स्थानबद्ध असलेले माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले, त्यात त्यांची दाढी वाढल्याचा दिसत होते. यावरून भाजपने त्यांना रेजर पाठविले असून, काँग्रेसची मदत घेण्याचाही सल्ला दिला आहे.

उमर अब्दुल्ला यांच्या फोटोवर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्याने हे छायाचित्र अल्पावधीतच व्हायरल झाले. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला कलम 370 रद्द झाल्यापासून उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे तिघे माजी मुख्यमंत्री स्थानबद्ध आहेत. इंटरनेट सुरू होताच दाढी वाढलेल्या उमर अब्दुल्ला यांचे छायाचित्र ट्‌विटरवर प्रसिद्ध झाले. या छायाचित्रात ते चटकन ओळखू येत नाहीत, त्यामुळे अनेकांना धक्का बसला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी छायाचित्र पाहून धक्का बसल्याचे सांगत काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.

आता यावरून भाजप तमिळनाडूने ट्विट करत त्यांना रेजर पाठविल्याचा स्क्रिनशॉट ट्विट केला आहे. पण, त्यांनी हे ट्विट डिलीट केले. रेजर गिफ्ट केल्याचा स्क्रिनशॉट शेअर करताना त्यांनी म्हटले होते, की प्रिय उमर अब्दुल्ला, तुम्हाला असे पाहून खूप दुःख झाले. तुमचे अनेक भ्रष्ट दोस्त बाहेर मजा करत आहेत. कृपया तुम्ही हे गिफ्ट स्वीकारावे आणि अन्य कोणत्या मदतीची गरज असेल तर काँग्रेसशी संपर्क करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Shivaji Patil : आमदार शिवाजी पाटील गोकुळच्या पहिल्याच कुस्तीत चितपट, मंत्री हसन मुश्रीफांचा पहिला डाव यशस्वी

Mumbai: मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र पहिला, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ; क्रायची नोंद

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT