JNU vc Shanti shree Pandit 
देश

JNU च्या कुलगुरुंकडून निरक्षरतेचं प्रदर्शन; वरुण गांधींची टीका

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदींसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आभार मानणारे पत्र जेएनयुच्या नव्या कुलगुरु शांतिश्री पंडित यांनी लिहिलं आहे.

नवी दिल्ली - भाजप नेते वरुण गांधी हे सातत्यानं गेल्या काही काळापासून पक्षाला घरचा आहेर देत आहेत. अनेकदा त्यांनी पक्षाच्या कारभारावर थेट टीकाही केली आहे. आता त्यांनी जेएनयूच्या नव्या कुलगुरु शांतिश्री पंडित यांच्यावर निशाणा साधला आहे. जेएनयूच्या कुलगुरु असलेल्या शांतिश्री या निरक्षरतेचं प्रदर्शन असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. तसंच जेएनयूच्या कुलगुरुपदी नियुक्तीनंतर शांतिश्री पंडित यांनी शेअर केलेल्या प्रेस रिलिजचा फोटो शेअर करून त्यातील व्याकरणाच्या चुकाही दाखवून दिल्या आहेत.

वरुण गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं की, जेएनयुच्या नव्या कुलगुरुंच्या प्रेस रिलीजमध्ये अनेक व्याकरणाच्या चुका आहेत. अशा प्रकारच्या नियुक्त्यांमुळे आपल्या एकूणच मनुष्यबळाची खिल्ली उडवली जात असून तरुणांच्या भविष्याचा खेळ केला जातोय अशी टीका वरुण गांधी यांनी केलीय.

जेएनयूच्या नव्या कुलगुरु शांतिश्री पंडित यांनी प्रेस रिलीजमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आभार मानले आहेत. यात त्यांनी विद्यार्थ्यांना पारदर्शक प्रशासन देण्यासाठी प्राधान्य राहील असंही सांगितलं आहे. मात्र यात काही व्याकरणाच्या चुका वरुण गांधींनी दाखवून दिल्या आहेत. यामध्ये Will Strive ऐवजी Would Strive, Stident-Friendly ऐवजी Students Friendly आणि Excellence ऐवजी Excellences असं कुलगुरुंनी लिहिलं असल्याचं वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर यामुळे शांतिश्री पंडित यांना ट्रोलही केलं जात आहे.

पुणे विद्यापीठात दहा वर्षापूर्वी झाली होती कारवाई

डॉ. पंडीत यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.यामुळे डॉ. पंडीत यांच्यावर सुमारे दहा वर्षापूर्वी झालेल्या कारवाईची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे. डॉ.पंडीत या पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना तत्कालिन कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर यांनी २००२ साली त्यांच्याकडे इंटरनॅशनल स्टुडन्टस सेंटरच्या (आयएससी) संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.२००२ ते २००७ या काळात त्यांच्याकडे हा कार्यभार होता. परदेशी विद्यार्थ्यांच्या कोट्यातील बेकायदा प्रवेश प्रकरणात (पीआयओ) नोकरीतील सेवाशर्तींचे नैतिक अध:पतन झाल्याचा आरोप ठेवत तब्बल पाच वेतनवाढी रोखण्याची कारवाई त्यांच्यावर झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: निवडणुकीदरम्यान काय करू नये? आचारसंहितेत काय सांगितलं आहे आधी समजून घ्या... नाहीतर बसेल फटका

Siddaramaiah Reactions: मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर सिद्धरामय्यांचा संताप! काँग्रेस हायकमांडचाच निर्णय अंतिम अफवांना पूर्णविराम!

Train Accident : भीषण रेल्वे दुर्घटना! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू

Motivational Stories: दहावी नापास पण जिद्दीची साथ! आदिवासी तरुणाची प्रेरणादायी झेप; एमपीएससी परीक्षेत मोठे यश

Latest Marathi News Live Update : बिबट्यांना रेस्क्यू सेंटरला देण्याची परवानगी घेणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT