Lal Krishna Advani 
देश

Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

Lal Krishna Advani hospitalized: मिळालेल्या माहितीनुसार, वयासंबंधी आलेल्या अडचणीमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वयासंबंधी आलेल्या अडचणीमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना आरोग्यासंबंधी काही अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यांना सध्या जिरियाट्रिक विभागात (वृद्धांचे उपचार करणारा विभाग) डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. बुधवारी रात्री त्यांना त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार भारतरत्न याच वर्षी देण्यात आला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना सन्मान स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च रोजी स्वत: अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जयदीप धनखड, राजनाथ सिंह आणि अमित शाह हे देखील उपस्थित राहिले होते.

अडवाणी यांचे भारतीय जनता पक्षाच्या उभारणीमध्ये मोठे योगदान राहिलेले आहे. राम मंदिर आंदोलनाचे ते एक अग्रणी नेते होते. त्यांनी २२ सप्टेंबर १९९० मध्ये गुजरातच्या सोमनाथमधून अयोध्यापर्यंत रथयात्रा काढली होती. या यात्रेचा देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडला. भाजपच्या वाढीसाठी राम मंदिर आंदोलन महत्त्वाचं ठरल्याचं बोललं जातं. कारण, या माध्यमातून अनेक लोक भाजपशी जोडले गेले होते.

अडवाणी हे उपपंतप्रधान देखील राहिले आहेत. क्षमता आणि संधी असताना देखील त्यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली. सर्वाधिक काळ लोकसभेमध्ये विरोधीपक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वयाच्या १४ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. १९८० मध्ये भाजपच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक आहेत. त्यांनी पक्षाचं अध्यक्षपद तीनवेळा सांभाळलं आहे. ते १९८९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT