राहुल गांधी 
देश

'बंगालची संस्कृती नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न'

राहुल गांधी यांची टीका, विद्वेषाच्या राजकारणापासून दूर राहण्याचा लोकांना सल्ला

नामदेव कुंभार

सिलिगुडी १४ : ‘‘बंगालमध्ये ज्या दिवशी भाजपच्या विचारधारेचा प्रवेश होईल, त्यादिवशी बंगालमधील संस्कृती नष्ट व्हायला सुरुवात होईल,`` असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांची सभा झाली. त्यांची ही पहिलीच सभा होती. राहुल गांधी म्हणाले, `` भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि मोदी जेथे जातात तेथे विद्वेष पसरविणे सुरू होते. बंधुत्व, एकात्मता यांबाबत ते बोलू शकत नाहीत. नागरिकांना एकमेकांशी लढायला लावणे हेच त्यांचे काम आहे. हाच त्यांचा डीएनए आहे.’’महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

``भाजप ज्या ज्या ठिकाणी जातो, त्या त्या ठिकाणी विद्वेषाची बीजे पेरतो. सात-आठ वर्षांपूर्वीचा भारत पाहा आणि आणि आताचा. फरक लगेच लक्षात येईल, अशी टीका करून राहुल गांधी म्हणाले, ``कोरोनाचा संसर्ग वर्षभरापूर्वी जेव्हा भारतात सुरू झाला होता, तेव्हा मी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सांगितले होते की मोठे संकट येणार आहे. त्याला तोंड देण्याची तयारी करा. परंतु त्यावेळी काही लोकांनी आणि काही माध्यमांनी आमची चेष्टा केली. परंतु, आताची परिस्थिती आपण सर्वजण पाहतच आहोत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. काही कृती करण्याऐवजी त्यांनी त्यांनी लोकांना टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, मोबाईलचे टॉर्च लावा अशा गोष्टी करा कोरोना पळून जाईल, असे सांगितले. सध्याची यूपीची स्थिती पाहा. मृतदेहांचा खच झाला आहे. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही. परंतु, याबाबत मोदी काही बोलले? देशभरातील स्थिती गंभीर आहे. परंतु, काहीच केले जात नाहीये.``

देशाची अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. नोकऱ्या नष्ट झाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. महागाई नियंत्रणाबाहेर आहे. सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. नरेंद्र मोदी यांचे दोन-तीन मित्र देशाला चालवत नाहीत. छोटे दुकानदार, व्यावसायिक, गरीब, मजूर, शेतकरी असे तुम्ही सर्वजण देश चालविता. काँग्रेसने अशा सर्वांची काळजी घेतली. काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांत आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका

राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली. लोकांना नोकऱ्या दिल्याचे त्या म्हणतात. पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही, असे ते म्हणाले. भाजप-आरएसएस ही एक विचारधारा आहे. काँग्रेसही एक विचारधारा आहे. हा विचारधारांचा संघर्ष आहे. त्यांच्या विचारधारेने आमचे सर्वांत मोठे नेते महात्मा गांधी यांची हत्या केली. भाजप-आरएसएससोबत काँग्रेस कधीही हातमिळवणी करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT