BJP will contest Rajasthan elections in the name of PM Modi BJP will contest Rajasthan elections in the name of PM Modi
देश

वसुंधरा राजेंना मोठा झटका! राजस्थान भाजप प्रमुखांनी केली ही घोषणा

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जनता पक्ष (BJP) पुढील वर्षी राजस्थानमध्ये (Rajasthan) होणाऱ्या विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नावाने लढवणार आहे. राजस्थान भाजपचे प्रमुख सतीश पुनिया यांनी शनिवारी (ता. २१) ही घोषणा केली. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. (BJP will contest Rajasthan elections in the name of PM Modi)

कधी चेहरे जाहीर होतात तर कधी नाही. भाजप आगामी निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या नाहीत, तरीही आम्ही जिंकलो. जयपूरमध्ये भाजपच्या तीन दिवसीय रणनीती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सतीश पुनिया यांनी ही माहिती दिली.

आगामी निवडणुकीच्या वर्षभराआधी हे विधान आले. राज्य भाजप प्रमुखांनी देखील पक्षाने नेतृत्वाची पुढची पिढी कशी तयार केली यावर भर दिला. यामुळे वसुंधरा राजे यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी तसेच सतीश पुनिया यांच्याशी असलेले संबंध हा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, असे वृत्त फेटाळण्याचे अनेक प्रयत्न दोन्ही बाजूंकडून करण्यात आले.

वसुंधरा राजे यांचा ६९ वा वाढदिवस बुंदी जिल्ह्यातील केशोराईपाटन येथील मंदिराला भेट देऊन आणि रॅली काढून साजरा करण्यात आला. याकडे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेकांनी पाहिले. वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनी अशोक गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या जाहीर सभेला पोहोचलेली गर्दी आणि सतीश पुनिया वगळता डझनभर खासदार आणि आमदारांची उपस्थिती यावरून राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सिद्ध केले होते.

राजेंकडे नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका?

वसुंधरा राजे व भाजप (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमवेत मंचावर आणि एक दिवसापूर्वी जयपूरमध्ये झालेल्या रोड शोमध्ये पुनिया आणि इतर नेत्यांशिवाय दिसल्या होत्या. राजस्थान (Rajasthan) भाजप अध्यक्षांच्या या घोषणेमुळे राजे यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका असू शकते. परंतु, त्या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार नसू शकतात. याचे संकेत म्हणून पाहिले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : अरूप बिस्वास यांची ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून क्रीडा मंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती

SCROLL FOR NEXT