Loksabha Election 2024 esakal
देश

Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सामाजिक वातावरण बिघडवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आले असले तरी लोकसभेला तिथली जनता मोदींच्या पाठीशी राहील.

सांगली : महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सामाजिक वातावरण बिघडवले आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना शिवसेना-भाजप सरकार शोधून काढेल आणि त्यांचा बंदोबस्त करेल, असा इशारा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

‘मोदी ॲट ९’ कार्यक्रमांतर्गत ते जिल्हा दौऱ्यावर आहेत. ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ३५० जागा जिंकेल, आम्ही सांगली जिंकू आणि देशही जिंकू, मात्र ज्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, असे लोक मोदींना टक्कर देण्याची भाषा करत आहेत. जे स्वतःचे राज्य चालवू शकत नाहीत, ते देश काय जिंकणार?

काँग्रेस, जनता दल, महाविकास आघाडी कोणाकडेही मुद्दा नाही. आम्ही विकास केला आहे. त्यामुळे जनता आमच्या साथीला उभी आहे. उत्तर प्रदेशातून काँग्रेस संपली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत ती थोडी जिवंत आहे, तीही संपून जाईल. राहुल गांधी विष पेरत आहेत. विदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत, हे भाजप आणि हा देश खपवून घेणार नाही’, असे ते म्हणाले.

जातीनिहाय जनगणनेला भाजपचा कधीच विरोध नव्हता, मात्र विरोधकांत या विषयावर बोलण्याची हिंमत आहे का, असा सवाल त्यांनी केला, मात्र खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांवर चौकशी सुरू असल्याने काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आले असले तरी लोकसभेला तिथली जनता मोदींच्या पाठीशी राहील.

२०१८ ला तेच झाले होते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन सचिव मकरंद देशपांडे, निवडणूकप्रमुख दीपक शिंदे, शेखर इनामदार, प्रदेश सदस्य पृथ्वीराज पवार, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

राज्यनिहाय धोरण वेगळे’

बिहारमध्ये छोटा पक्ष असून, नितीनकुमार यांना मुख्यमंत्री बनवणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागा कमी असल्याचे कारण सांगत त्यांना मुख्यमंत्रिपद नाकारले, असे का, या प्रश्‍नावर श्री. मौर्य म्हणाले, ‘प्रत्येक ठिकाणचे धोरण वेगळे असते. उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला आम्हाला फसवले. आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर स्वबळावर सत्ता आणली असती.’ स्वबळावर सत्तेचा विश्‍वास आहे तर मग अजित पवारांशी चर्चा का सुरू ठेवता, या प्रश्‍नावर म्हणाले, ‘अजित पवार यांच्याशी आमच्या कोणत्याही चर्चा सुरू नाहीत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT