Farmer Agitation Sakal
देश

भाजप कार्यकर्ते-आंदोलक भिडले; गाझियाबाद सीमेवर तणावपूर्ण वातावरण

विनायक होगाडे

गाझीयाबाद: भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये आज दिल्ली आणि उत्तरप्रदेश सीमेवर जोरदार राडा झाला. येथे भाजप कार्यकर्त्यांनी एका नेत्याच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक काढली होती. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर दुपारी बाराच्या सुमारास हा मार्च आणि आंदोलक शेतकरी आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलक शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये लाठ्याकाठ्यांनिशी जोरदार हाणामारी झाली. या राड्यामध्ये दोन्ही बाजूंकडील लोक मोठ्या संख्येने जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे स्थानिक नेते अमित वाल्मीकी यांच्या स्वागतासाठी ही मिरवणूक काढण्यात आली होता. यावेळी शेतकरी आंदोलकांनी जोरदार दगडफेक करत वाल्मीकी यांच्या ताफ्यातील अनेक वाहनांची मोडतोड देखील केली. दुसरीकडे शेतकरी नेत्यांनी मात्र आमच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी भाजपकडून हे कारस्थान आखण्यात आले असल्याचा आरोप केला आहे.

भारतीय किसान युनियनने यासंदर्भात ट्विटरवर म्हटलंय की, भाजप कार्यकर्त्यांनी आज गाझीपूर बॉर्डरवरील फ्लायवेवर मोठ्या संख्येने एकत्र येत कुणा नेत्याच्या स्वागताच्या बहाण्याने ढोल वाजवत आंदोलनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी त्यांना हुसकावल्यानंतर त्यांच्यावरच लाठी-काठ्यांनी हल्ला चढवला गेला. भाजप आता आंदोलनाला हिंसक मार्गाने थांबवू इच्छित आहे. आज गाझीपूर बॉर्डरवर भाजप कार्यकर्त्यांद्वारे केलेली हिंसा याचंच उदाहरण आहे. सगळ्या शेतकरी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आंदोलनाला वाचवावं.

तर दुसरीकडे भाजपने असा दावा केला आहे की, त्यांच्यावर या आंदोलकांनी दगडफेक केली. तर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दावा केलाय की, शेतकऱ्यांसोबत झालेल्या या घटनेला भाजपच जबाबदार आहे. हा भाजपचाच कट होता, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT